राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार -2021 ने सन्मानित

प्रहार टाईम्स

गोरेगाव : सौ. किरण पुरुषोत्तम कावळे सहशिक्षिका जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पाथरी पं. स. गोरेगाव जि. गोंदिया यांची शिक्षक ध्येय आणि मातृसेवा फाऊंडेशन च्या वतीने
राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी निवड करून सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कारासाठी शैक्षणिक क्षेत्रातून विविध राज्यांमधून आपले उपक्रम सादर केले होते यामध्ये प्राथमिक शिक्षणात कला, कार्यानुभव व सहशालेय उपक्रमातून व्यवसाय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. ह्या सौ. किरण पुरुषोत्तम कावळे सहशिक्षिका जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पाथरी, यांच्या उपक्रमाची निवड करण्यात आली.

प्राथमिक शिक्षणाबरोबर हवे ते कौशल्य विकसित करण्यासाठी प्राथमिक स्तरावर सहशालेय उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन विविध सहशालेय उपक्रम राबविले. कला, कार्यानुभव याद्वारे, शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी केली.
विद्यार्थी विकास, शिस्त, कार्यकुशलतेतून, आत्मविश्वास, आदर, अभ्यासूवृत्ती, आणि शैक्षणिक प्रगती अशा विविध घटकांचा विकास साधता येतो यासाठी अनेक उपक्रम राबविले.
शिक्षक ध्येय आणि मातृसेवा फाऊंडेशन या सं स्थेद्वारा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सदर यशाचे श्रेय आपले शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी, कुटुंबीय, सहकारी तसेच
व्यवस्थापन समिती ,पालक, यांना दिले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share