LOGO

गिरोला येथील नागरिकांची जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसाठी

मागील 18 वर्षापासून भटकंती शासन- प्रशासनाचे दुर्लक्

तालुका प्रतिनिधी

सालेकसा 20:
सालेकसा तालुक्यातील ग्रामपंचायत गिरोला येथे 18 वर्षांपूर्वी ग्रामपंचायतचे दस्तावेज रेकॉर्ड जळाले होते. परंतु आज पर्यंत नागरिकांना जुने रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यात करण्यात आले नाही .त्यामुळे नागरिकांना महिलांना, विद्यार्थ्यांना विविध अडचणी अडचणींच्या सामना करावा लागत आहे. परंतु याकडे ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हास्तरावरून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना असा प्रश्न पडला आहे की जावे तर कोणाकडे?
सविस्तर असे की सन- 1999 -2002 या वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायत गिरोला येथे आग लागून सर्व जुने दस्तावेज जळाले होते. अशी तक्रार पण पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. परंतु एवढे वर्ष लोटूनही जुने रेकॉर्ड उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे नागरिकांना जायचे कुणाकडे असा प्रश्न पडला आहे? जुने रेकॉर्ड उपलब्ध झाले नाही. तर बहुतेक विद्यार्थ्यांना नोकरीपासून तसेच नागरिकांना विविध दाखले बनवण्यासाठी वंचित राहावे लागणार आहे. प्रत्येक नागरिक हा दाखल्यासाठी न्यायालयात जाऊ शकत नाही. गावातील नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायत पंचायत समिती व व जिल्हा प्रशासनाला लोकप्रतिनिधींना वेळोवेळी पत्र देऊनही कोणतीच कार्यवाही करण्यात आले नाही. आणि म्हणून गिरोला येथील नागरिकांना एकच प्रश्न पडत आहे की जुने रेकॉर्ड केव्हा उपलब्ध होणार?

Print Friendly, PDF & Email
Share