बिबट शावकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

साकोली ◼️येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने बिबट्याच्या शावकाला धडक दिली. यात शावकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 19 मार्च रोजी पहाटे 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राष्ट्रीय महामागावर असलेल्या मोना इंडस्ट्रीज परिसरात उत्तरेकडून दक्षिणेकडे बिबट्याचा शावक रस्ता ओलांडत असताना अज्ञात ट्रकने त्यास चिरडले. डोक्यावरून ट्रकचा चाक गेल्याने शावकाचा जागीच मृत्यू झाला. सदर बिबट बछडा हा किमान 1 वर्षाचा असून जंगलमार्गाने अन्नाच्या शोधात भरकटत महामार्ग परीसरात आला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Print Friendly, PDF & Email
Share