ध्येय आणि संघर्षाची सांगड घाला यश नक्कीच मिळेल: गशिअ. महेंद्र मोटघरे

◼️केएस जैन विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन

देवरी ◼️ तालुक्यातील के एस जैन महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन संपन्न झाले असून सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. वर्षा गंगणे, देवरीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, प्राचार्य डॉ. सुजित टेटे, प्राचार्या रझिया बैग मंचावर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व फीत कापून करुन करण्यात आली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि वार्षिक शैक्षणिक अहवाल प्राचार्या रझिया बैग यांनी सादर केला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थी जीवनात संघर्ष आणि मेहनतीचे महत्व प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी प्रेरणादायी विचार मांडले, देवरीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांनी ध्येय आणि संघर्ष यांची सांघळ घालून यशाची प्रचिती नक्कीच मिळेल याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रख्यात व्यक्तिमत्त्व असलेल्या प्राधापिका डॉ. वर्षा गंगणे यांनी विद्यार्थिनींना प्रत्येक स्पर्धेत उतरून आपले अस्तित्व निर्माण करा, क्षेत्र कुठलाही असो आपला सहभाग निश्चित दाखवा असे प्रेरणादायी मार्गदर्शन यावेळी केले.

कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मुर्तरुप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले नृत्य प्रस्तुत करुन सर्वांचे मने जिंकली. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. ऊर्मिला परिहार यांनी केले असून शिक्षिका विद्या येवले यांनी आभार मानले.

Share