पहाटे पहाटे देवरी शहर धुक्यात हरवले…! पावसाच्या सरी बरसल्या…

देवरी ◼️ देवरी शहर व परिसरात सर्वत्र रात्रीपासून धुक्याची दाट चादर पसरल्याने दिवस उगवल्यानंतरही काही अंतरावरील व्यक्ति व वाहन स्पष्टपणे दिसत नसल्याने महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता.

मागील दोन- तिन दिवसांपासून देवरी शहर परिसरात ढगाळ वातावरण असून आज पहाटे पावसाच्या सरी बरसल्या . आज पहाटेपासून सर्वत्र धुके पसरल्याने काही अंतरावरील देखिल स्पष्ट दिसत नव्हते. वाहनचालक गाडीच्या लाईट तसेच इंडिकेटर दिवे लावून वाहने चालवत होते. पहाटे पायी(मॉर्निगं वॉक) चालण्याकरिता जाणार्‍यांकरिता धुक्याची ही चादर वेगळीच पर्वणी ठरली होती . धुकं ऐवढ दाट होते की सकाळी ८ वाजे पर्यंतही सुर्यनारायण धूक्यात हरवले होते.

Share