देवरी तालुक्यात बत्ती गूल, वीज कर्मचारी संपावर

देवरी◼️वीज क्षेत्रातील कर्मचारी मंगळवार मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या संपावर गेले आहेत. याचा परिणाम महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांच्या दैनंदिन कामकाजावर होण्याची शक्यता असतांना आज सकाळी देवरी तालुक्यातील बत्ती गुल झालेली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने महावितरणच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवान्यासाठी अर्ज केला आहे. याद्वारे महावितरण कंपनी अदानी समूहाला विकली जाणार असल्याच्या समजुतीतून हा संप पुकारण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समिती यांनी या तीन दिवसीय संपाची हाक दिली आहे. त्यामध्ये राज्य सरकारी महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तिन्ही कंपन्यांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांशी संबंधित २४ संघटना या समितीत आहेत. ‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स’नेही (सिटू) या संपाला पाठिंबा दर्शवला आहे. या तिन्ही कंपन्यांमध्ये मिळून जवळपास हजारो कर्मचारी असून त्यामधील अधिक कर्मचारी व अधिकारी या संघटनांशी संलग्न आहेत. त्यामुळे एकूणच या संपाचा मोठा परिणाम राज्यातील वीज प्रणालीवर होण्याची शक्यता आहे.

Share