मातृशक्ती संमेलनात लोकप्रतिनिधी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आमगावः विश्वमांगल्य सभेच्या वतीने 25 डिसेंबर रोजी साखरीटोला/सातगाव येथील शामलाल दोनोंडे यांच्या सभागृहात आमगाव विधानसभा क्षेत्रातील सालेकसा, आमगाव, देवरी या तीन तालुक्यातील आजी व माजी महिला लोकप्रतिनिधीकरिता मातृशक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात होते. या संमेलनात क्षेत्रातील जिप, पंस, ग्रापंचे कार्यरत व माजी महिला सदस्यानी स्वयंस्फूर्त सहभाग घेतला होता.संघटनमंत्री तेजशा जोशी, गोंदिया/भंडारा जिल्हा संघटक निकिता शिरसाट, लोकप्रतिनिधी परिवार प्रमुख शुभांगी सुनील मेंढे, जिप महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, जिप सदस्या उषा मेंढे, माजी जिप सभापती लता दोनोंडे यांच्या हस्ते भारतमातेच्या चित्राला माल्यार्पण व दीपप्रज्वलीत करून करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक तेजशा जोशी, निकिता शिरसाट, शुभांगी मेंढे, उषा मेंढे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असतांना सुद्धा राष्ट्रीय व पारंपरिक गृहरचना हे महापुरुषांच्या निर्मितीचे शक्तिकेंद्र बनले पाहिजे. सुदृढ राष्ट्रनिर्मितीला महत्त्वाचा हातभार मातेचा असतो. अपत्यामध्ये चारित्र्य, संस्कार राष्ट्रप्रेम कसे रुजवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. मातृशक्ती ही घरची आत्मा असते. कर्तव्यनिष्ठ मातृत्वच देशाचा भावी भविष्य विचारवंत महापुरुष घडवू शकते. प्रत्येक घराला सुसंस्कारी मातृत्व प्राप्त व्हावे व प्रत्येक घरातून सुसंस्कारी, राष्ट्रप्रेमी तेजस्वी संतान निर्माण व्हावे. महिला सदाचार, छात्र सदाचार, बाल संस्कार, भारतीय इतिहास, संस्कृती, परंपरा, व त्यामागील वैज्ञानिक बाबीची माहिती व्हावी, हेच विश्वमांगल्य सभेचे मुख्य उपक्रम आहे, असे उ्दगार आजी माजी लोकप्रतिनिधीच्या मातृशक्ती संमेलनात व्यक्त केले. यावेळी संस्कार व महिला शसक्तीकरणं विषयावर एक अंकी नाटिका व विश्व प्रार्थना सादर करण्यात आले. संचालन माजी पंस सदस्य प्रतिभा परिहार यांनी केले. आभार तोशिका पटले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंदूताई कोरे, सविताताई पुराम, शालिनीताई बडोले, मंगलाताई कोरे, टीनाताई चुटे, मायाताई चुटे, मिनू शिवणकर, उर्मिला दोनोंडे, परिश्रम घेतले.