शासनाने शेतक-यांना दिलेल्या मुदतीच्या आत धान खरेदी केन्द्रावर आपले धान विकावे: भरतसिंग दुधनांग

देवरी, ता.२३: शासनाच्या आदिवासी विकास महमंडळाचे प्रादेशिक कार्यालय भंडारा अंतर्गत धान खरेदी हंगाम २०२२-२३ या मध्ये शासकिय आधारभूत धान खरेदी केन्द्र हे आदिवासी सहकारी संस्थे द्वारे चालवीत आहेत. यात जिल्ह्यात एकूण ४४ धान खरेदी केन्द्रा पैकी गोरे, आलेवाडा, व पलानगाव या धान खरेदी केन्द्रांना वगळून उर्वरीत ४१ खरेदी केन्द्रांना परवानगी देण्याय आली असून ह्या सर्व धान खरेदी केन्द्र सुरू आहेत. तरी गोंदिया जिल्ह्यातील शेतक-यांनी आपले धान शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीच्या आत धान खरेदी केन्द्रावर विकावे असे आवाहन आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनांग यांनी शुक्रवार (ता.२३ डिसेंबर) रोजी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात भरतसिंग दुधनांग यांनी म्हटले आहे की, नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीलाच २६ धान खरेदी केन्द्रांंना मंजूरी मिळाली होती आणि इतर १८ पैकी ३ वगळून उर्वरीत १५ केन्द्राना त्यांच्याकडील ३ टक्यावर जास्त घटतुट असल्याने त्यांना धान खरेदी केन्द्राची मान्यता मिळाली नव्हती परंतू आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनांग यांच्या पुढाकाराने उर्वरीत संस्थांनी घटतुट भरून दिल्याने त्यांना नंतर धान खरेदी केन्द्र सुरू करण्याची परवानगी मिळाली.
हा सर्व विषय व संदर्भ दि. ३०/१०/२०२२ रोजी पार पडलेल्या आदिवासी सेवा सहकारी संस्थेच्या संघात मांडण्यात आले होते .तरी या विषयाला आदिवासी सेवा सहकारी संस्थेच्या संघातील पदाधिका-यांनी गांभीर्याने घेतले नाही. आणि म्हणून हेतू परस्पर या प्रकरणाला चिघडण्याचे काम केले यात शासन व आदिवासी विकास महामंडळ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करन्यात आला.
यात विशेष म्हणजे अगोदर आदिवासी संस्थेच्या संघटनेनी आदिवासी सहकारी संस्थे मार्फत धान खरेदी न करण्या बाबद
विनाकारण बहिष्कार टाकल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील शेतकरी अडचणीत सापडले आणि नाईलाजासत्व त्यांनी आपले धान कवडी मोल किंमतीत व्यापा-यांना विकले.त्यामुळे त्यांची पिळवणूक झाली. आता या सर्व विषयावर वाद संपलेला आहे.
तरी ग्रामीण क्षेत्रातील शेतक-यांनीआपले धान शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीच्या आत धान खरेदी केन्द्रावर विकावे असे आवाहन आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनांग यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

Share