गणित म्हणजे तार्किक विचार आणि वास्तविकतेला चालना देणारे साधन: प्राचार्य डॉ. सुजित टेटे

◼️ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे ‘जागतिक गणित दिवस’ उत्साहात साजरा

देवरी ◼️ भारतात दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतातील महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना समर्पित आहे. 2012 मध्ये, केंद्र सरकारने अशी घोषणा केली होती की, दिग्गज गणितज्ञ रामानुजन यांच्या स्मरणार्थ 22 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे राष्ट्रिय गणित दिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. सुजित टेटे, गणित विभागाचे शिक्षक नावदेव अंबादे , विश्वप्रित निकिडे, गुंजन जैन, चंद्रकांत बागडे आदि मंचावर उपस्थित होते.

हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यामध्ये गणिताच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करणे. गणित विषयाची आवडनिर्माण करणे, विविध स्पर्धा च्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना विकसित करणे असा आहे. यामुळेविद्यार्थ्यांना गणिताच्या क्षेत्रात संशोधन करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले जाते.गणित विषयावर प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या सह गणित विषयाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन विद्यार्थी इशिका काळे आणि इशिता उंदीरवाडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन संचिता शेंद्रे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share