ग्रा.पं. निवडणुकीत 4 पत्रकारांचा विजय

गोंदिया ■ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रसार माध्यमात काम करणारे अनेक पत्रकारही निवडणुकीच्या रिंगणात होते.

यामध्ये सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी चंद्रकुमार बहेकार, गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार ग्रा. पं. मध्ये सदस्य पदासाठी भरत घासले, गोंदिया तालुक्यातील कामठा येथे सदस्य पदासाठी उमेंद्र गजभिये, खातिया येथे सदस्य पदासाठी विजेंद्र मेश्राम आदींनी यश संपादन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share