पिंडकेपार येथील अध्ययन कक्षाला स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट

■ लिनेस क्लब ची डिस्ट्रीक सेक्रेटरी शिला मारगाये व रजनी शर्मा यांचा पुढाकार.

देवरी,ता.१६: लिनेस क्लब देवरीच्या डिस्ट्रीक सेक्रेटरी शिला मारगाये आणि बुलेटीन एडिटर रजनी शर्मा यांच्या पुढाकार व सहकार्याने देवरी तालुक्यातील पिंडकेपार येथील शहीद गेंदसिंह नायक अध्ययन कक्षातील विद्यार्थांना सुध्दा स्पर्धा परिक्षेत काही अडचण येऊ नये म्हणून या अध्ययन कक्षाला स्पर्धा परिक्षेची पुस्तके शुक्रवारी रोजी भेट दिली.
यात सविस्तर असे की, ग्रामीण भागातील गोरगरीब समाजातील हुशार विद्यार्थांनी सुध्दा देशाच्या राष्ट्रीय प्रवाहात सहभाग घेण्याकरिता स्पर्धा घेता यावे ह्या दुष्टिकोनातून लिनेस क्लब देवरीच्या डिस्ट्रीक सेक्रेटरी शिला मारगाये आणि बुलेटीन एडिटर रजनी शर्मा यांनी पुढाकार घेत पिंडकेपारच्या शहीद गेंदसिंह नायक या अध्ययन कक्षाला स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट दिली.
या प्रसंगी लिनेस क्लब देवरीच्या अध्यक्ष गौरी देशमुख, सचिव शिला बांते, कोषाध्यक्ष कमलेश्वरी गौतम, माजी अध्यक्ष वनिता दहिकर, एस.टी. मारगाये सर, विलास येले, प्रदीप कोल्हारे, हंसराज खांडवाये, तरूण खांडवाये, विकास कोल्हारे, विकास घासले, देव नाईक, सचिन भंडारी यांच्यासह बहुसंख्येने वाचक विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक शिला मारगाये यांनी तर संचालन प्रा. मधु दिहारी यांनी आणि उपस्थिंताचे आभार मंगेश वालापूरे यांनी मानले.

Share