गोंदिया जिल्ह्यात 345 ग्रामपंचायतींच्या निवडणुका संपन्न, देवरी तालुक्यात 77.57% मतदान

◼️उमेदवारांचे भवितव्य एव्हीएम मशीनमधे बंद , २० डिसेंबर ला लागणार निकाल

गोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा निवडणूक थाटात पार पडली असून जिल्ह्यातील 345 ग्रामपंचायतींवर जनतेतून थेट सरपंचाँचे भवितव्य एव्हीएम मशीन मधे बंद झाले आहे . गुलाबी थंडीत जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले होते आज मतदान होताच मतदानाची जुळवा जुळव गावगावात बघावयास मिळाली.

देवरी तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीचे मतदान पार पडले असून तालुक्यात 77.57% मतदान झाले आहे. येत्या 20 डिसेंबर ला या निवडणुकीचे निकाल घोषित होणार असून “दूध का दूध और पाणी का पाणी” समोर येणार आहे.

सर्वाधिक मतदान देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत मुरपार येथे झाले असून तालुक्यात अतिशय शांततेत मतदान झाल्याचे चित्र आहे.

गोंदिया जिल्ह्यातील 348 ग्रामपंचायतींपैकी गोंदिया तालुक्यातील 71, तिरोडा तालुक्यातील 74, आमगाव तालुक्यातील 34, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील 40, देवरी तालुक्यातील 25, गोरेगाव तालुक्यातील 30, सडक-अर्जुनी तालुक्यातील 43, सालेकसा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींचे मतदान झाले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन , पोलीस प्रशासनाने मोलाचे भूमिका बजावली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share