जातीय समिकरण आणि कुटुंब संख्येच्या बळावर फुक्कीमेटा ग्रा. पं. चे रणसंग्राम

◼️सरपंचपद महिलांसाठी आरक्षित

देवरी १६: तालुक्यातील फुक्कीमेटा ग्रा.प.च्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अभियान चांगलाच तापत चालला आहे. या ग्रा.प.च्या रणसंग्रामात सर्वच पदासाठी २- २ उमेदवार असल्याने थेट लढत होत असल्याचे पहवयास मिळत आहे. दोन पॅनल निवडणूक लढवित असली तरी राजकिय पक्षांचा रंग निवडणूक प्रचार दरम्यान गडद होत चालला आहे.

देवरी तालुक्यातील फुक्कीमेटा या ग्रा.प.चे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित आहे. त्याच बरोबर तीन वार्डाच्या ९ सदस्य पदासाठी निवडणूक होत आहे. निवडणूक रिंगणात दोन पॅनल असल्याने थेट निवडणुकीसह प्रचारातही चांगलीच रंगत येऊ लागली आहे. सरपंच पदाच्या रिंगणात सुनिता सराटे व सुलोचना सराटे हे दोन उमेदवार भाग्य अजमावित आहे. त्याच बरोबर ९ सदस्यांपैकी एकूण १८ उमेदवार निवडणूक लढवित आहे. या ग्रा.प. मध्ये प्रत्येक पदासाठी २-२ उमेदवार असल्याने निवडणूक होत आहे. राजकिय पक्ष, कुटुंब संख्या बळ, जातीय गणित सर्व निवडणूक समिकरणाचे गमक ठरू लागले आहे. येत्या १८ डिसेंबर रोजी मतपेटीच्या माध्यमातून मतदार कोणत्या पॅनलकडे ग्रा.प.च्या सत्तेची किल्ली सोपविणार या कडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Share