ग्रामपंचायत निवडणुकीत हाइटेक तरुणाई, अनुभवी राजकारण्यांची थेट तरुणपिढीशी सामना

गोंदिया १६ः जिल्ह्यातील ३४८ ग्रा.प.च्या निवडणुका होत आहेत. यंदाच्या निवडणुकीची विशेषतः म्हणजे तडफदार युवकांनी रिंगणात उडी घेतली असून सध्या निवडणूक होत असलेल्या अनेक गावात सरपंच पदासह सदस्य पदांच्या लढतीत नव्या पिढीचे उमेदवार दिसत आहे. त्यामुळे गावातील राजकारणात प्रस्थापित समजल्या पुढाऱ्यांना युवकांनी आव्हान निर्माण केले आहे.

जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतीत यंदा निवडणूक होत असून यामध्ये सरपंच पदासाठी १००७ तर सदस्य पदांसाठी ६२१० उमेदवार उतरले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांचा समावेश असून त्यांनी गावातील राजकारणात प्रस्थापित समजल्या जाणाऱ्यांचे टेंन्शन वाढविल्याचे दिसत आहे.

७ डिसेंबर रोजी चिन्ह वाटप झाले व तेव्हापासून प्रचाराची रणधूमाळी सुरु झाली आहे. त्यात विशेष म्हणजे गावातील युवकांच्या मदतीसाठी युवकांची फौज तैनात असल्याचे दिसत आहे. परिणामी विरोधातील उमेदवरांला निवडणूक कठीण जात आहे. आतापर्यंत जुन्या राजकारण्यांनी राज्य केले असून आता हे चित्र बदलविण्यासाठी युवा मैदानात उतरले आहेत. त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचेही दिसन येत आहे.

परंतु राजकरणात घाम गाळलेल्या अनुभवी खेळाडू समोर हायटेक तरुणाई मजल मरणार का याकडे जिल्हावाशियांचे लक्ष लागले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share