ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचाराच्या कारणावरुन दोन गटात भांडण 9 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
सर्व आरोपींना अटक 28/12/2022 पर्यंत न्यायालयीन कोठडी
Arjuni Mor: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हाधिकारी गोंदिया यांचे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील जनतेला शांततेत व भयमुक्त वातावरणात ग्रामपंचायत निवडणुका पार पाडण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. असे असतांना सुध्दा अर्जुनी मोरगाव अंतर्गत ग्राम ताडगाव येथे दोन गटात निवडणुकीच्या प्रचारा वरून 14/12/2022 चे 20.30 वाजता चे सुमारास आपसी वाद व भांडण झाल्याने संदिप वसंता नाकाडे, वय ३७ वर्षे ,चंद्रशेखर दयाराम नाकाडे, वय ३७ वर्षे ,स्वप्नील गोपाल नाकाडे, वय २५ वर्षे, प्रमोद तेजराम नाकाडे, वय ४२ वर्षे, मुकेश लिलेश्वर रुखमोडे, वय ३२ वर्षे ,सुनील गोपाल नाकाडे, वय ४२ वर्षे, सर्व राहणार ताडगाव, तालुका अर्जुनी/मोरगाव जिल्हा गोंदिया, मंगेश नरेंद्र कापगते, वय ३२ वर्षे राहणार ताडगाव तालुका अर्जुनी/मोरगाव जिल्हा गोंदिया, यांना व त्यांचे मित्रांना गैरकायदयाची मंडळी जमवुन फिर्यादीचे घराचे अंगणात जावुन शिवीगाळ फिर्यादीस व त्याचे मित्रांना विनाकारण शिवीगाळ करून मारपीट करण्याची धमकी दिली तसेच जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले. यावरून वरील नमूद आरोपीतांविरूद्ध पो.स्टे.अर्जुनी मोरगाव येथे तक्रारीवरून अप.क्र. 271 / 2022 कलम 143, 147, 149, 447, 504, 506१ भारतीय दंड संहिता, सहकलम 37(1), (3), महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये. गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अमित उर्फ अविनाश रामदास नाकाडे, वय ३६ वर्षे , नंदकिशेर रामदास नाकाडे, वय ३२ वर्षे , नितीन रुपंचद नाकाडे, वय ४० वर्षे, सर्व राहणार ताडगाव तालुका अर्जुनी/मोरगाव जिल्हा गोंदिया यांनी संदिप वसंता नाकाडे, वय ३८ वर्ष, राहणार ताडगाव, तालुका अर्जुनी/मोरगाव यांना व त्याचे मित्रांना रस्त्यात अडवुन “तुम्ही दुसऱ्या पार्टीचा प्रचार करू नका, आमच्या पार्टीचा प्रचार करा, आम्ही तुम्हाला पैसे देणार व दारुपाणी पाजणार” असे बोलल्यावर फिर्यादीने व त्याचे मित्रांनी नकार दिल्याने फिर्यादीस व त्याचे मित्रांना शिवीगाळ करून मारपीट करण्याची धमकी दिल्याने तसेच नमूद आरोपितांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांचे निवडणुक प्रक्रिया मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपीत ईसम 1 ते 3 यांचे विरुद्ध पो.स्टे.अर्जुनी/ मोरगाव येथे अप.क्र.272 /2022 कलम 341, 504,506,34, 171,(ई),171, (एफ) भारतीय दंड संहिता, सहकलम 37 (1),(3) महाराष्ट्र पोलीस अधिनीयम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आले आहे. सदर दोन्ही घटनेच्या अनुषंगाने दोन वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले असून अर्जुनी मोरगाव पोलीस तपास करीत आहेत .
वरील घटनेच्या अनुषंगाने तसेच दिनांक 18/12/2022 रोजी होवू घातलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचे अनुषंगाने गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन तर्फे शांतता राखण्याचे तसेच शांततेत व भयमुक्त वातावरणात ग्राम पंचायत निवडणूक पार पाडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.