ग्राम बिंझली व लटोरी येथे आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे अनुषंगाने सालेकसा पोलीसांचे रुट मार्च व दंगा काबू सरावाचे आयोजन

Salekasa 15: आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे अनुषंगाने परीसरातील जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, भयमुक्त वातावरणात ग्राम पंचायत निवडणूक शांततेत पार पाडावे, या करीता केशोरी पोलीस स्टेशन च्या वतीने पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे सा., अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री.अशोक बनकर सा. यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री. विजय भिसे सा. यांच्या उपस्थीतीत बिंझली व लटोरी गावातुन मुख्य रस्त्याने रूट मार्च काढण्यात आले. तसेच बिंझली येथील मुख्य चौकात नागरिकांच्या उपस्थीतीत दंगाकाबु योजने अंतर्गत दंगा नियंत्रणा बाबत सराव घेण्यात आला. यावेळी ठाणेदार स.पो.नि.जनार्दन हेगडकर सा., सपोनि. थिटे सा., पो.उप.नि.पठाडे सा. हजर होते. सदर रूट मार्च व दंगा काबु योजनेच्या सरावात पोलीस स्टेशन सालेकसा, C-60 सालेकसा अंमलदार हजर होते. सदर सरावाचे प्रात्यक्षीकाचे सादरीकरण झाल्याने गावक-यांमध्ये पोलीसांप्रती विश्वासाची व सुरक्षिततेची भावणा निर्माण झालेली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share