चिन्मय गोतमारे गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी

गोंदियाः गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांची नियुक्ती केली आहे. डॉ. नयना गुंडे यांची 15 डिसेंबरला सामान्य प्रशासन विभागाने बदली केली असून त्यांच्या जागेवर चिन्मय गोतमारे यांना तत्काळ आपल्या पदाचा पदभार वरिष्ठांच्या सल्ल्याने इतरांना सोपवून गोंदियात रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोतमारे हे 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.नागपूर विद्यापीठातून त्यांचे शिक्षण झालेले आहे.त्यांनी मेघालय राज्यातही आपली सेवा दिलेली आहे.तसेच य़शदा पुणे येथेही काम केले आहे.

Share