आरटीई फाउंडेशनचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे धरणे 22 ते 28 डिसेंबरला धरणे आंदोलन व मोर्चा
गोंदिया :- खाजगी कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत न्यायोचित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आरटीई फाउंडेशन च्या वतीने हिवाळी अधिवेशन नागपूर येथे धरणे 22 ते 27 डिसेंबरला धरणे आंदोलन व 28 डिसेंबरला विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात येत आहे.
गोरगरिबांना विद्यार्थ्यांना कॉन्वेंटचे शिक्षण मिळावे, यासाठी खाजगी शाळांमध्ये 25 टक्के नुसार प्रवेश देण्यात येते. या अनुषंगाने सदर विद्यार्थ्यांची प्रतिपूर्ति संबधित शाळांना देण्यात येते. मात्र गेले शैक्षणिक सत्र 2012-13 ते 2020-21 चे दुर्बल घटक व वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे आरटीई प्रतिपूर्ति चे अंदाजे 16 ते 17 कोटी शासनाकडे शिल्लक आहे. त्यामुळे अनेक शाळा डबघाईस आलेल्या आहेत. त्याकरिता ती रक्कम शासनाकडून त्वरित शाळांना पुरविण्यात यावी. दरम्यान आरटीई फाउंडेशन तर्फे अनेकदा निवेदन सादर करण्यात आल्यानंतर आता शासनाकडून शिक्षणाधिकारी यांच्या परिपत्रकानुसार शैक्षणिक सत्र 2012-13 ते 2020-21 चे शिल्लक असलेल्या शैक्षणिक शुल्कापैकी काही प्रतिपूर्ति जिल्हा परिषदेकडे उपलब्ध झालेली आहे ते शैक्षणिक शुल्क शाळेकडून कोणतेही प्रपत्र न मागता ती रक्कम शाळेला लवकरात लवकर वाटप करण्यात यावी. त्याचबरोबर शासनाकडून नुकतेच जाहीर केलेल्या टीसी विना प्रवेश हे शैक्षणिक धोरण खाजगी संस्थेच्या हिताशी नसल्याने उपरोक्त नियन मागे घेण्यात यावे. तसेच जुन्या शाळेतून टीसी न घेऊन जाता दुसर्या शाळेत कसे प्रवेश दिले जाते याचे समाधानकारक मार्ग शासनानेकाढावे. त्याचप्रमाणे मा. शिक्षणाधिकारी यांनी पालकांकरिता टीसी काढण्याची एक ठराविक कालावधि निश्चित करून जुन्या शाळेची शिल्लक असलेली शुल्क जमा केल्यानंतर टीसी पालकांना देण्यात यावी असे प्रपत्र काढण्यात यावे. तसेच सत्र 2012-13 ते 2021-22 पर्यंतचे प्रलंबित आरटीई ची प्रतिपूर्ति शाळांना लवकरात लवकर प्रदान करण्यात यावी जर प्रतिपूर्ति देण्यात आली नाही तर गोंदिया जिल्ह्य़ातील सत्र 2023-24 चे आरटीई चे प्रवेश घेतले जाणार नाही अश्या अनेक प्रकारच्या मागण्यांकरिता हेधरणेआंदोलन करण्यात येणार आहे. त्याकरिता गोंदिया जिल्ह्य़ातील सर्व संस्था संचालकांनी जास्तीत जास्त संख्येने या धरणे आंदोलनाला उपस्थित राहावे. असे आवाहन संघटनेचे जिल्हा कार्यकारिणीचे जिल्हा अध्यक्ष प्रा. आर. डी. कटरे,सचिव सुनील आवळे, जिल्हा उपाध्यक्ष योगिता बिसेन, राजेश गोयल, जिल्हा सहसचिव श्री खलील खान पठाण, सतीश बन्सोड, श्रीमती गीता वर्मा, जिल्हा मार्गदर्शक डॉ. नीरज कटकवार, अनिल अग्रवाल, खुशाल कटरे, चेतन बजाज, प्रफुल्ल भालेराव, वाय. टी कटरे, श्री प्रशांत लील्लारे, एकनाथ बोरकर, नरेश शहारे, प्रकाश पंचभाई, श्री संतोष राऊत, राजेन्द्र सोनवणे, एस. एच. येळे, भारतलाल ताजने, राजेन्द्र बडोले, यांनी केले.