ओवारा ग्रामपंचायतीत काका विरुध्द पुतण्या, १५ वर्षे सत्तेत अनुभवी उमेदवाराची नवख्या उमेदवाराशी लढत

प्रा. डॉ. सुजित टेटे

देवरी १५ः तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी ओवारा या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी दोन उमेदवार असल्यामुळे थेट लढत पहावयास मिळत आहे. त्याच प्रमाणे निवडणुकीच्या रिंगणात दोन पॅनल अमोरा-समोर निवडणूक लढवित आहेत. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार भाजप समर्थित असून एकाच कुटुंबातले आहेत. तालुक्यातील ओवारा
ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून
मतदारांना सरपंचासह एकूण ७ उमेदवारांना निवडणूक द्यायचे आहे. निवडणूक प्रचाराला काही दिवसाचा कालावधी उरलेला आहे. यामुळे मतदारांसह उमेदवारांमध्येही चुरस वाढत चालली आहे. येथील सरपंच पद सर्वसाधारण राखिव आहे. सरपंच पदासाठी कमल येरणे व भाऊराव येरणे हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे थेट सामना रंगत चालला आहे. त्याच प्रमाणे सहा सदस्य पदासाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत.

कमल येरणे यांची २००७ पासून २०२२ पर्यंत ओवारा ग्रामपंचायतीवर १५ वर्षाची सत्ता असून यावर्षी पुन्हा सरपंच पदाकरिता जनतेच्या हक्काचे उमेदवार म्हणून बघतिले जात आहेत. कमल येरणे यांनी २००७ पासून ग्रामपंचायत ओवारा येथे उपसरपंच म्हणून एंट्री मारली तेव्हा पासून त्यांनी मागे वळुन बघतले नाही. यांनी सरपंच सेवा महासंघ विदर्भ अधक्ष म्हणून मोलाची भूमिका बजावली असून कृषी उत्पन्न बाजार समिती चे सदस्य देखील आहेत.

दुसरी कडे भाऊराव येरणे यांची ही पहिली परीक्षा असून , त्यांचा आता पर्यंत कुठलाही राजकिय इतिहास बघावयास मिळाला नाही.

अनुभवी राजकिय पक्षात सक्रिय उमेदवारासमोर नवख्या उमेदवाराला मतदार राजा काय प्रतिसाद देतो या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share