ब्लॉसम स्कूलची आस्था अग्रवाल १० वी च्या परीक्षेत देवरी तालुक्यात अव्वल


◼️ब्लॉसम पब्लिक स्कूलची १००% निकालाची परंपरा कायम

देवरी – तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी SSC परीक्षा -2026 ( इंग्रजी माध्यम) परीक्षेत भरारी मारली असून घवघवीत यश संपादन करीत तालुक्यात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. परीक्षेत बसलेले सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल दरवर्षी प्रमाणे 100 टक्के लागला आहे.

यामध्ये इंग्रजी माध्यमातील आस्था अग्रवाल (484/500) 96.80 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम क्रमांक , मेघा तावाडे हिने 82 टक्के गुण प्राप्त करून शाळेतून द्वितीय क्रमांक ,विभूती असाटी हिने 80.60% % तृतीय क्रमांक पटकावून ब्लॉसम पब्लिक स्कूल चे नाव लौकिक केले.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे, वर्गशिक्षक नामदेव अंबादे , नितेश लाडे , वैशाली मोहुर्ले , सरिता थोटे, तेजस्विनी नंदेश्वर, रविना फुंडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें