महालॅब प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर : कर्मचारी चिंतेत

गोंदिया :कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता रक्ताचे नमुने गोळा करणाऱ्या महालॅब अंतर्गत कार्यरत फ्लेबोटोमिस्ट कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. गरज संपली म्हणून शासनाने या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे का असा संतप्त सवाल भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी शेकडो उपस्थित केला आहे. महालॅब प्रकल्प बंद करण्याच्या निर्णयामुळे बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांना निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडून प्रकल्प सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागात मोफत रक्त तपासणी सुविधा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना केवळ ५,९४० रुपये इतके अत्यल्प मानधन मिळत होते. इतक्या कमी पगारातही दुर्गम भागात सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांची सेवा आता जिल्हा आरोग्यअधिकाऱ्यांच्या पत्राद्वारे बंद करण्यात आल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. आमदार विनोद अग्रवाल यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत कर्मचाऱ्यांच्या बाजूने आक्रमक पवित्रा घेतला.

महागाईच्या काळात ५ हजार रुपयांत कोणाचे घर चालणार, असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे. कामावरून काढलेल्या या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक विधवा महिला आणि गरजूंचा समावेश आहे. केंद्र सरकारने निधी बंद केला असला तरी राज्य सरकारने आपल्या निधीतून या अनुभवी कोविड योद्ध्‌यांना रिक्त तांत्रिक पदांवर सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें