गोंदिया वन परिक्षेत्र अधिकारी कौशिक निलंबित

♦️प्रधान मुख्य वनसंरक्षकांची कारवाई, गोंदिया वनविभागात खळबळ

गोंदिया : वन्यप्राण्यांकडून होणारे पीक नुकसानी यासह अन्य तक्रारींचा पाढा गोंदिया तालुक्यातील नागरिकांनी थेट प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे वाचला. वारंवार सुचना देवून सुधारणा झाली नाही. त्यामुळे अखेर वनपरिक्षेञ अधिकारी दिलीप कौशीक यांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. या कारवाई जिल्ह्यातील वनाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
.गोंदिया वनविभागात दिलीप कौशीक गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात बऱ्याच तक्रारीचा निपटारा करण्यात आला नाही. जगलव्याप्त भाग म्हणून गोंदियाची ओळख आहे. जगलांलगत अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. जंगलालगतच्या शेतीचे वन्यप्राण्यांकडून सातत्याने नुकसान होते. त्याची नुकसान भरपाई व शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात वनपरिक्षेञ अधिकारी अपयशी ठरले. वारंवार निवेदने देवून तक्रारींचा निपटारा होत नसल्याने शेतकऱ्यांनी याबाबतचा पाढा मुख्य वनसंरक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे वाचला. त्यांनीही याबाबतची सुचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. माञ, त्यांच्या सुचनांना पायदळी तुळविण्याचे काम सबंधित वनपिरक्षेञ अधिकाऱ्यांनी केले. यासह अन्य तक्रारींचा पाढा सबंधितांनी वाचला. त्यामुळे त्याना सुरवातीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. माञ, समाधानकारक खुलासा न केल्याने त्यांना अखेर निलंबित करण्यात आले. याबाबत उपवनसंरक्षक पवनकुमार जोग यांनी कौशीक यांना निलंबित करण्यात आल्याच्या वृत्ताल दुजोरा दिला आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें