आदिवासी संस्कृतीचा जागर: पुराडा येथे भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

देवरी (प्रहार टाईम्स):आदिवासी संस्कृतीचे जतन आणि समाजहिताचा वसा जपत, देवरी तालुक्यातील पुरडा येथे भव्य ‘आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात आदिवासी समाजातील अनेक वधू-वर विवाहबंधनात अडकणार असून, हा सोहळा सामाजिक एकोप्याचे एक उत्तम उदाहरण ठरणार आहे.

हा सोहळा माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य सविता संजय पुराम व मित्र परिवार, तसेच माँ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिर समिती, देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत होणाऱ्या या सोहळ्यासाठी स्थानिक प्रशासनाचेही सहकार्य लाभले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचे नियोजन खालीलप्रमाणे आहे:

  • मंडप पूजन: शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ | वेळ: सायंकाळी ७.०० वा.
  • गोंडीयन संस्कृती मांडरी: शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ | वेळ: रात्री ८.०० वा.
  • मुख्य विवाह सोहळा: रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ | वेळ: सकाळी ११.०० वा.
  • शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, पुराडा, ता. देवरी, जि. गोंदिया.

या मंगल सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत, ज्यात प्रामुख्याने:

ना. चंद्रशेखर बावनकुळे (प्रदेशाध्यक्ष, भाजप, महाराष्ट्र) ना. डॉ. अशोक उईके , ना. डॉ. पंकजजी भोयर ,ना. इंद्रनीलनाईक, खा. मायाताई इनवाते, खा. डॉ. नामदेव किरसान, आ. परिणय फुके, जिप अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार संजय पुराम (आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र)यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.

आयोजकांच्या वतीने सौ. सविता पुराम आणि आमदार संजय पुराम यांनी या ऐतिहासिक आणि मांगलिक सोहळ्याला सर्व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन केले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें