देवरी: गोंदिया जिल्हा पोलीस दलांतर्गत पोलीस स्टेशन देवरी अंतर्गत पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेप्रमाणे अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रवीण डोंगे पोलीस स्टेशन देवरी यांनी पो. स्टे. हद्दीतील इसम नामे खुशाल कैलास राऊत वय-२१ वर्ष, रा. वॉर्ड क्र. १७ देवरी, ता. देवरी, जि. गोंदिया यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन देवरी येथे सन-२०२४ ते सन-२०२५ पर्यंत अवैध दारू विक्री करणे तसेच महिलांची छेडछाड करणे असे गुन्हे केल्याने त्याच्यामुळे बहुतेक कुटुंब दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त झाले तसेच समाजातील महिलांच्या व विद्यार्थ्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने सदर इसमाबाबत कलम-५६(अ)(ब) मपोका अन्वये हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करून कविता गायकवाड, उपविभागीय दंडाधिकारी देवरी यांचेकडे सादर केले असता त्यांनी सदर प्रकरणाची चौकशी व सुनावणी करून इसम नामे खुशाल कैलास राऊत वय-२१ वर्ष, रा. वॉर्ड क्र. १७ देवरी, ता. देवरी, जि. गोंदिया यास उपविभागातील देवरी, आमगाव, सालेकसा तालुक्यातून ०६ महिन्याकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिले. सदर इसमास आदेशाची प्रत तामील करून दिनांक-१५/०४/२०२५ रोजी उपविभागातील देवरी, आमगाव, सालेकसा तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
पो. नि. प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली असून पो. हवालदार धर्मराज कटरे /२५०८, मपोशी नीता कांबळे /३७९ पोलीस स्टेशन देवरी यांनी कार्यवाही केली आहे.








