लॉसम शाळेत ‘अनुभवांच्या गुजगोष्टी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

देवरी : ब्लॉसम शाळेत विद्यार्थ्यांसाठी “अनुभवांच्या गुजगोष्टी” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी उमाशंकर शर्मा आणि मान्यवर अनिल महेशकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

यावेळी उमाशंकर शर्मा यांनी आपल्या सेवाकाळातील विविध अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा यांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अनिल महेशकर यांनीही जीवनातील संघर्ष, ध्येय निश्चिती आणि यश मिळविण्याचे सूत्र विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुजित एच. टेटे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अशा अनुभवांमधून प्रेरणा घेऊन स्वतःचे भविष्य घडविण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका नलू टेंभरे, संगीता काळे, तेजस्विनी नंदेश्वर यांनी केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें