पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत ग्राम केशोरी येथे आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे अनुषंगाने रुट मार्च व दंगा काबू सरावाचे आयोजन

केशोरीः आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे अनुषंगाने परीसरातील जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, भयमुक्त वातावरणात ग्राम पंचायत निवडणूक शांततेत पार पाडावे, या करीता केशोरी पोलीस स्टेशन च्या वतीने पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे सा., अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री.अशोक बनकर सा. यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री. संकेत देवळेकर सा. यांच्या उपस्थीतीत केशोरी गावातुन मुख्य रस्त्याने बाजार चौक, ते बिरसा मुंडा चौक, डॉ. आंबेडकर चौक, मश्जीत चौक असा रूट मार्च काढण्यात आले. तसेच शिवाजी चौक येथे नागरिकांच्या उपस्थीतीत दंगाकाबु योजने अंतर्गत दंगा नियंत्रणा बाबत सराव घेण्यात आला.

यावेळी ठाणेदार पोनि. , विलास नाळे सा., सपोनि. शेख सा., तसेच एसआरपीफ ग्रुप क्रमांक १५ चे पो.नि. मडावी सा. हजर होते. सदर रूट मार्च व दंगा काबु योजनेच्या सरावात पोलीस स्टेशन केशोरी, आय. आर. बी. गट १५ चे पोलीस अंमलदार हजर होते.
सदर सरावाचे प्रात्यक्षीकाचे सादरीकरण झाल्याने गावक-यांमध्ये पोलीसांप्रती विश्वासाची व सुरक्षिततेची भावणा निर्माण झालेली आहे.

Share