देशी, विदेशी दारु ने भरलेल्या 506 नग बाटल्या ( 7 नग बॉक्स मध्ये ), दोन मो. सा. असा किंमती 1 लाख 26 हजार 324 रुपयाचा मुद्देमाल जप्त

गोंदिया ः जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत अवैधरीत्या चालणारे धंदे व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचे अनुषंगाने, जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व आळा घालण्याकरीता पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे यांनी विशेष पथकाची स्थापना करून सदर पथकास या बाबत आदेशित केले होते.

त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर, यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी श्री. संकेत देवळेकर यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची अवैध धंद्याविरुद्ध विशेष धाड मोहीम सुरु आहे.

विशेष पथकाने मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस ठाणे गोंदिया शहर हद्दीतील यादव चौक अंडर ग्राउंड रोड परिसरात छापा कारवाई केली असता-

१) लिलाधर तालिराम ढोके, वय २७ वर्ष, रा. बलमाटोला ता.जि. गोंदिया

*२) आकाश संभाजी मानकर, वय २८ वर्षे रा. सुर्याटोला, ता. जि. गोंदिया

त्यांचे ताब्यातील दोन मोटर सायकलने अवैधरित्या विना परवाना देशी व विदेशी दारुची वाहतूक करतांना मिळून आल्याने आरोपी क्र.१ यांचें ताब्यातून एक मो.सा. व देशी विदेशी दारूचे पाच नग बॉक्स ज्यामध्ये देशी विदेशी दारूच्या 448 नग बाटल्या असा किंमती – 85,960/-रूपयाचा मुद्देमाल व आरोपी क्र. 2) आकाश संभाजी मानकर, वय 28 वर्षे रा. सुर्याटोला, ता. जि. गोंदिया यांचे ताब्यातून एक मो. सा. व दोन बॉक्स मध्ये 58 नग विदेशी दारूच्या बाटल्या असा किंमती– 40,374/- रूपयाचा मुद्देमाल असा दोन्ही आरोपींच्या ताब्यातून एकूण *किंमती– 1,26,324/- रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या विना पास परवाना वाहतूक करतांनी मिळून आल्याने जप्त करण्यात आले आहे.

१) लिलाधर तालिराम ढोके, वय २७ वर्ष, रा. बलमाटोला ता.जि. गोंदिया व*

) आकाश संभाजी मानकर, वय २८ वर्षे रा. सुर्याटोला, ता. जि. गोंदिया यांचे विरुद्ध पोलीस ठाणे *गोंदिया शहर येथे अप. क्र. 791/2022 कलम 65 (ई), 77 (अ) महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये* गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन मुद्देमालासह आरोपी गोंदिया शहर पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही गोंदिया शहर पोलीस करीत आहेत. सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री. संकेत देवळेकर यांचे नेतृत्वात विशेष पोलीस पथकामधील पोलीस अंमलदार पो.हवा. सुजित हलमारे, पो.हवा. महेश मेहर, पो.ना. शैलेषकुमार निनावे, पो. शि. सन्नी चौरसिया, दया घरत, चा.पो.शि. हरिकृष्णा राव यांनी केलेली आहे.

Share