उपविभागीय पोलीस अधीकारी, देवरी यांचे अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील युवक युवतींना पोलीस भरती, स्पर्धा परिक्षा, रोजगार या विषयांवर मार्गदर्शन
देवरीः पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र भरनोली कार्यक्षेत्रातील आदिवासी अतिदुर्गम भागातील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल मौजा- भरनोली गावातील दिपस्तंभ वाचनालयात उप विभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री संकेत देवळकर यांनी भेट देऊन वाचनालयातील उपस्थीत असलेले २५-३० युवक, युवतींना आगामी पोलीस भरती व ईतर स्पर्धा परिक्षा विषयावर तसेच शारीरीक चाचणी परिक्षा संबंधाने सविस्तर मार्गदर्शन करुन परिक्षेत असलेल्या सिलॅबस प्रमाणे अभ्यास केल्यास आपण परिक्षेत नक्कीच यशस्वी व्हॉल. याकरीता सर्वांनी तसा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे असल्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे अग्नीवीर मध्ये भरती झालेल्या युवकांचे स्वागत करण्यात आले. तदनंतर उपस्थीत २५-३० युवक-युवतींना पेन वाटप करुन सर्वांना सविस्तर मार्गदर्शन करुन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
सदर भेटी दरम्यान पोलीस स्टेशन केशोरी येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री.विलास नाळे, सशस्त्र दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी श्री.अनिल टार्फे तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री. मंगेश वानखडे वाचक फौजदार उपविभाग देवरी व अंमलदार हजर होते.