सालेकसाः गोंदिया जिल्हात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासून निवडणुक असलेल्या गावागावात निवडणुकीचे वातावरण तापले आहे.
निवडणुक शांतेत आणि सुव्यवस्थित पार पाडावी या उद्देशाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सालेकसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक जनार्दन हेगडकर आणि पोलीस कर्मचारी तालुक्यात मॉक ड्रिल च्या माध्यमातून निवडणुक जनजागृती आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य बजावत आहेत.
निवडणुक शांततेत पार पडणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.








