देशी दारुच्या 10 पेट्यांसह आरोपी अटक

गोंदिया: पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. संकेत देवळेकर यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 13/12/2022 रोजी पोलिस ठाणे गोंदिया ग्रामीण, हद्दीतील फुलचुर येथे छापा कारवाई केली असता पोलिस पथकाने धडक कारवाईकरत बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करणार्‍या आरोपीला 10 पेट्या दारूसह अटक केली. विजय सेवकराम वैरागडे (40) रा. फुलचुर असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई आज मंगळवार 13 डिसेंबर रोजी शहरातील आरटीओ कार्यालयाच्या मागे फुलचू नाका येथे करण्यात आली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातुन 33 हजार 600 रुपये किमतीच्या 10 पेट्यांमधून 480 नग देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.

जिल्ह्यात 18 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरमार्गाचा उपयोग करून मतदारांना विविध आमिषे दिली जातात. दारूचे वाटपही केले जाते. याच अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध धंद्याचे उच्चाटन व आळा घालण्याकरीता नव्यानेच रुजू झालेले पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विशेष पथकाची स्थापना केली असून अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. आज पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरातील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातील फुलचूर नाका येथे पोलिस पथकाने आरोपी विजय वैरागडे यांच्या घरी धाड घातली. धाडीत आरोपीच्या घरी 10 पेट्यांमध्ये 488 नग देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पालिस स्टेशन येथे आरोविरूद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून मुद्देमालासह आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस हवालदार सुजित हलमारे, महेश मेहर, पोलिस नायक शैलेष निनावे, पोलिस शिपाई सन्नी चौरसिया, दया घरत, चालक पोलिस शिपाई हरिकृष्णा राव यांनी केली आहे.

Share