गझल
जाऊ नये कधीही इतक्या जवळ कुणाच्या
आहेत भावनाही जेथे उथळ कुणाच्या
येतात चहुकडेने चौकात चार रस्ते
ध्येयास गाठणाऱ्या वाटा सरळ कुणाच्या?
सत्ता बघून ज्यांनी तत्वे गहाण केली
समजून घ्या तुम्ही रे, खुर्च्या अढळ कुणाच्या?
तोवर कधीच कोणी धर्मांध होत नसतो
डोक्यात होत नाही जर सरमिसळ कुणाच्या!
शाबास कार्यकर्त्या!, ऐकून जोम येतो
सत्कारणी पडावे, हे पाठबळ कुणाच्या
ललित बोरकर
ब्रम्हपुरी, जिल्हा – चंद्रपूर
७९७२९०३६७७