ब्लॉसमच्या चिमुकल्यांची कविता गायन स्पर्धा संपन्न

देवरी : ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे कविता गायन कार्यक्रम घेण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ सुजित टेटे , स्वप्नील पंचभाई, योगिता मेश्राम , निरीक्षक म्हणून कलावती ठाकरे, मनीषा काशीवार , तनुजा भेलावे आदी उपस्थित होते.

यावेळी नर्सरी , केजी च्या चिमुकल्या विध्यार्थ्यांनी कृती युक्त कविता सादर करून या कार्यक्रमाची शोभा वाढविली. चिमुकल्या मुलांचे आत्मविश्वास वाढावे आणि आनंदायी शिक्षणातून गुणवत्ता विकास व्हावी या उद्देशाने सादर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाच्या त यशासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केला.

Print Friendly, PDF & Email
Share