सीईओंनी घेतल्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कानपिचक्या, मुख्यालयी राहण्याच्या सुचना

◼️प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या भेटीत मुकाअ पाटील यांना आढळल्या त्र्युट्या

गोंदियाः प्रशासकीय यंत्रणेत कामकरणारे अधिकारी, कर्मचा र्म री कर्तव्यदक्ष व प्रामााणिक असल्यास नागरि समस्यांचे निराकरण होण्यास वेळ लागत नाही. मात्र असे अधिकारी कर्मचारी निदर्शनास येणे दुरापास्त झाले आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य संस्था कार्यरत असल्या तरी आज या संस्थांमध्ये विविध समस्या ऊभ्या ठाकल्या आहेत. काही समस्यांचे निराकरण स्थानिक स्तरावरूनही होऊ शकते,ते मात्र संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या दुर्लक्षीतपणामुळे कायम असतात.
परिणामी सर्वसामान्य नागरिकांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागते.नुकतीच गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल पाटील व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी कामठा, कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्रांना आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांना अनेक त्रुट्या आढळल्याने संबधित अधिकारी यांच्या कानपिचक्या घेतल्या. प्रसंगी पाटील यांनी तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना वैद्यकिय अधिकारी यांना दिल्या.ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या काळजी घेण्यासाठी जिल्ह्यात 40 प्राथमिक आरोग्य केंद्र, 257 उपकेंद्र आणि आरोग्य वर्धिणी केंद्र आहेत. त्यात कार्यरत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे सेवा देणे अप्रक्षित आहे. मात्र बहुतांश अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांची बाह्य व आंतरीक स्वच्छता निमित होत नाही. याचा त्रास येथे उपचारासाठी येणार्‍या नागरिकांना होतो. या संदर्भात अनेकदा नागरिकांच्या तक्रारीही होतात. सोमवारी जिपचे मुकाअ पाटील व अति. जिल्हा आरोग्य अधिकारी सुतार याना कामठा व कालीमाती प्राआ केंद्रांला भेटी दरम्यान त्र्युट्या आढळून आल्या.यावेळी त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना चांगलेच फटकारले. यावेळी पाटील यांनी केंद्राच्या आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता नियमितपणे करणे, सर्व कर्मचार्‍यांनी बायोमेट्रिक हजेरी नोंदविणे, ओपीडी दरम्यानच्या वेळेत डॉक्टारांनी उपस्थित राहून रुग्णांना चांगल्या आरोग्य सोयी देणे, क्षेत्रीय कर्मचार्‍यांनी नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन करणे, पर्यवेकक्षांनी उपकेंद्रांना भेटी देवुन सर्व राष्ट्रीय
आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेणे, हलचल रजिस्टरवर नोंदी करुनच मुख्यालय सोडणे, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी उत्तम प्रकारे करणे, कर्मचार्‍यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, नागपूर येथे 19 डिसेंबर पासुन सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशन दरम्यान सर्व आरोग्य संस्थाचे रेकॉर्ड अद्यावत करुन मुख्यालयी राहण्याच्या सुचना केल्या.

Share