दिवसाढवळ्या बँकेसमोरून वृद्धाचे ४० हजार घेऊन पसार होणाऱ्या चोरास दिला चोप
देवरी १४ः दिवसाढवळ्या बँकेसमोरून वृद्धाचे ४० हजार घेऊन पसार होणाऱ्या चोरास दिला चोप, प्राप्त माहितीनुसार एसबीआय बँकेसमोर ४० हजार रुपये पिशवीत घेऊन वृद्ध व्यक्ती बँक व्यवहारासाठी असतांना चोराने त्याच्या जवळील पिशवी हिसकावत पसार केले. प्रसंगवधान साधत बँक चे सुरक्षा रक्षक आणि माजी जीप सदस्य राजू चांदेवार यांनी चोराला महामार्गावरील जैन पेट्रोलपॅंप परिसरात रंगेहात पकडून जमावाने चोरास चांगलाच चोप दिला. वेळेवर देवरी पोलिसांना सूचना देवून चोरास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत.