NH6 च्या रुंदीकरणात मंजूर प्रस्तावापेक्षा अतिरिक्त अवैध उत्खनन केल्याबाबत AGIPLकंपनीवर वनविभागाची कारवाई

साकोलीः वन प्रकल्प विभाग भंडारा अंतर्गत वनपरिक्षेत्र चंद्रपूर, मोहघाटा बीटातील कक्ष क्रमांक 188 मध्ये NH6 च्या रुंदीकरणात मंजूर प्रस्तावापेक्षा अतिरिक्त अवैध उत्खनन केल्याबाबत AGIPLकंपनीच्या विरोधात por क्रमांक 242/12दिनांक 13 /12 /2022 जारी करून अवैध उत्खननात वापरण्यात आलेली पोकलेन मशीन जप्त करण्यात आली. सदरची कारवाई मा. अभिजीत देशमुख, विभागीय व्यवस्थापक वन प्रकल्प विभाग, भंडारा. मा.कु. डी. बी. राऊत, सहाय्यक व्यवस्थापक, भंडारा यांच्या मार्गदर्शनात श्री आर. पी. साबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर. श्री. जे. एच. वंजारी, क्षेत्र सहाय्यक चिचगाव. कु. सी. एच. मोहरकर, क्षेत्र सहायक , सोनेगाव. श्री. सी. आर. कोरे वनरक्षक, मोहघाटा बिट, श्री. एस. एस. वाहने, वनरक्षक . श्री. डी. बी. कोडगीर. वनरक्षक,श्री. आर. डी. मते, वनमजूर श्री. जी. एम. खडसे, वाहनचालक यांनी पूर्ण केली. पुढील तपास चालू आहे..

Print Friendly, PDF & Email
Share