गोंदिया पोलीस पत संस्थेवर युवा परिवर्तन पॅनल चे वर्चस्व

युवा परिवर्तन पॅनल चे 7 उमेदवार विजयी

गोंदिया: – पोलीस दलात प्रतिष्ठेची मानली जाणारी गोंदिया पोलीस सहकारी पत संस्थेची निवडणूक चांगलीच रंगली होती. गोंदिया पोलीस पत संस्थेच्या 11 संचालक पदासाठी दि. 13/11/2022 ला निवडणूक घेण्यात आली होती. त्यात 42 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी युवा परिवर्तन पॅनल चे 7 उमेदवार व इतर 4 उमेदवार निवडून आले. दि. 30/11/2022 ला पदाधिकारी मंडळाची निवडणूक घेण्यात आली. त्यात युवा परिवर्तन पॅनल चे मनोज मेंढे अध्यक्ष, संतोष केदार उपाध्यक्ष, श्रीहरी कोरे सचिव, नंदा बडवाईक खजिनदार म्हणून यांची गुप्त मताने निवड करण्यात आली सोबत युवा परीवर्तन पॅनल चे संदीप तूलावी, रणधीर साखरे, कविता राठोड (तांडेकर) व ईतर पॅनल चे 4 उमेदवार हजर होते.

Print Friendly, PDF & Email
Share