छायाचित्र मतदार ओळखपत्रासोबत आधार लिंक करा

गोंदिया: नागरिकांनी आपल्या छायाचित्र मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड लिंक करून घ्यावे व नवमतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आधार लिंकिंग 59.78 टक्के झाले असून उर्वरित मतदारांनी आपले आधारकार्ड मतदान कार्ड सोबत लिंक करावे असे त्यांनी सांगितले.

भारतीय निवडणूक  (ELECTION) आयोगाच्या 2 ऑगस्ट रोजीच्या पत्रान्वये 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भारतीय निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार नागपूर विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादीची तपासणी केली व आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनमोल सागर, उपजिल्हाधिकारी सामान्य स्मिता बेलपत्रे, सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. 

जिल्ह्यात 10 लाख 97 हजार 510 मतदार (ELECTION) असून यापैकी 59.78 टक्के मतदारांनी आपले आधार कार्ड छायाचित्र मतदान ओळखपत्रांशी लिंक केले आहे अशी माहिती त्यांनी दिली. 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी तपासणाच्या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक म्हणून एकूण तीन भेटी देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्तांनी आज 28 नोव्हेंबर रोजी गोंदिया येथे प्रथम भेट दिली व जिल्ह्यातील मतदार याद्यांची तपासणी केली. या बैठकीत शासनाच्या विविध योजनांचाही आढावा घेण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजना प्राधान्याने राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. वनहक्क पट्टे वाटप बाबतीतही त्यांनी आढावा घेतला. रोहयोच्या कामाबाबत यावेळी माहिती सादर करण्यात आली. सार्वजनिक वितरण व्यवस्था व आधारभूत धान खरेदी आणि भरडाई या विषयाची चर्चा यावेळी करण्यात आली. ई-पंचनामा व पीक पाहणी प्रयोग काटेकोरपणे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

Share