‘गोंदिया भूषण’ पुरस्काराने प्राचार्य डॉ. सुजित टेटे पुणे येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मानित
गोंदिया :देवरी तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरीचे प्राचार्य डॉ.सुजित टेटे यांना “गोंदिया भूषण ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सन्मान जिल्हाचा सन्मान कर्तृत्वाचा सोहळा -2022” या कार्यक्रमात महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा “भूषण पुरस्कार” २६ नोव्हेंबरला अण्णा भाऊ साठे सभागृह पुणे येथे भव्य समारंभात गौरवण्यात आले.या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते ” डॉ. सुजित टेटे यांना सन्मानित करण्यात आले.
विविध शैक्षणिक व सामाजिक प्रयोग व उपक्रमाद्वारे आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी व त्यांच्या भावी आयुष्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. तसेच काळानुरूप तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल करत आहेत. शिक्षण क्षेत्रात करत असलेले अविरत परिश्रम, महत्वपूर्ण बदल व देत असलेले योगदान यामुळे ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेसाठी डॉ.सुजित टेटे हे आदर्श ठरले आहेत. म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व प्रेम व्यक्त करण्यासाठी “गोंदिया भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
डॉ.सुजित टेटे हे उच्चशिक्षित असुन त्यानी इंग्रजी विषयात स्नातकेत्तर पदवी व शिक्षणशास्त्राची पदवी घेतली असुन पीएच.डी. व डी लिट ने सन्मानित आहेत.त्याचे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिक व वृत्तपत्रात त्याचे प्रंबध प्रकाशित आहेत. अनेक लेख व कविता वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या असुन अनेक सेवाभावी संस्थेचे ते मानद सदस्य आहेत. काव्य लहरी, माॅरल स्टोरी, माझे माझ्याशीच स्पर्धा , विचारांची दुनिया ह्या पुस्तकांचे ते लेखक आहेत. परिवर्तन द चेंज, Determinetion of struggle व Notebook हे लघुचित्रपटाचे ते निर्माते आहेत. तसेच ते शोध पत्रकारिता करित असुन प्रहार टाईम्स हा त्यांचा स्वतंत्र ब्लाग आहे.
गोंदिया भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. सुजित टेटे यांचा या सन्मानाबाबद त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.