कवी सुदर्शन लांडेकर यांच्या प्रेम यात्री काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

देवरी २६ः आदिवासी बहुल क्षेत्रात जन्मलेले कवी सुदर्शन लांडेकर यांच्या 25 नोव्हेंबर जन्मदिवसानिमित्त पहिला काव्यसंग्रह “प्रेम यात्री” चे प्रकाशन देवरी येथिल सुखसागर हाँटेल च्या सभागृहात थाटात पार पडले.

हा प्रकाशन सोहळा अशोक बनकर ( अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोंदिया), संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया, यांचे शुभ हस्त पार पडला .

स्वतःच्या जन्मदिवसाच्या अवचित्याने 22 वर्षाच्या लेखणीला पुस्तकाच्या रूपात शब्दबद्ध करून कवी सुदर्शन लांडेकर यांनी देवरी परिसरातील वाचकांना आपला पहिला काव्यसंग्रह “प्रेम यात्री “पुस्तकाच्या रूपात उपलब्ध करून दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक अशोक बनकर , संकेत देवळेकर , दिलीप कोसरे (दिव्यांग मराठी चिञपट दिग्दर्शक ) , दिनेश फरफुडे(दिव्यांग मराठी निर्माता), डॉ. सुजित टेटे, निकेश अलोने भंडारा(कवी तथा पञकार) , विजयजी डहाके (लेखक) तथा ईतर मान्यवर आणि त्यांचे मित्रपरिवार कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.

या निमित्याने कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. सुजित टेटे यांनी केले आणि अथक परिश्रमाला फळ मिळतेच अशी ग्वाही देत कवी सुदर्शन लांडेकर यांचे शब्दसुमनांनी अभिनंदन केले.

तत्पूर्वी कवी सुदर्शन दांडेकर यांनी सर्व पाहुण्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवान्वित केले. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष मा.अशोकजी बनकर तथा उपस्थित सर्व मांन्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन करून कवी सुदर्शन लांडेकर यांच्या “प्रेम यात्री” काव्यसंग्रहाचे विमोचन करून संवेदनशील कवी सुदर्शन लांडेकर यांच्या निवडक कवितांचा उल्लेख करून सामाजिक, शैक्षणिक, बेरोजगारी,भूक ,आई ,बाप या कवितांचे उल्लेख करून या कविता मानवी जीवनाला खरोखर नवी दिशा देण्याचे काम करतील असे मा. अशोकजी बनकर सरांनी आपल्या रोचक शब्दात विश्लेषण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आणि कवी सुदर्शन लांडेकर यांच्या भावी आयुष्याबद्दल खूप खूप अभिनंदन केले.

दिलीपजी कोसरे , दिनेश फरफुंडे यांनी मोजक्या शब्दात “प्रेम यात्री” या काव्यसंग्रहावर प्रकाश टाकून आभिनंदन केले. कवी सुदर्शन लांडेकर यांनी मनोगतात आपल्या लेखणीची सुरुवात कधी आणि केव्हापासून झाली. आणि आपल्या “मित्रा तुझ्या मैत्रीचा” या कवितेचे वाचन करून पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हे भूपेश कुलसुंगे यांनी केले.

Share