तालुक्यात पारा घसरला !

गुलाबी थंडी ला सुरूवात

देवरीः आठवडाभरापासून (cold wave) जिल्हावासी गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहे. मागील तीन दिवसात संपूर्ण विदर्भात दुसर्‍या क्रमांकाच्या निच्चांकी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात घेण्यात आली. बोचर्‍या थंडीने जिल्हा गारठल्याचे चित्र असून नागरिक उबदार कपड्यासह शेकोटीचा आधार घेत आहेत.

यंदा हिवाळ्याची सुरुवात होऊन व दिवाळी सण आटोपल्यावरही तापमान कमी झालेले नव्हते. मात्र मागील आठवड्यापासून तापमानात सातत्याने घट होत आहे. उत्तर भारतातील डोंगरात प्रदेशात होणारी बर्फवृष्टी व राजस्थानमधून येणार्‍या थंड वार्‍यामुळे राज्यासह जिल्ह्यातही थंडीचा जोर वाढला आहे. मागील तीन दिवसात संपूर्ण विदर्भात जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकाची निच्चाकी तापमानाची नोंद झाली आहे. तीन दिवसापासून जिल्ह्यात 10.5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. आगामी आणखी काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे. दिवसाही वाहणार्‍या थंड वार्‍यामुळे बोचर्‍या थंडीचा सामना जिल्हावासींना करावा लागत आहे. त्यामुळे गरम कपडे घालुनच नागरिक घराबाहेर पडत आहे. ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून उब मिळविण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करीत असल्याचे दिसत आहे.

Share