नवेगाव-नागझरा व्याघ्र प्रकल्पात ठराविक वाहनांच प्रवेश
गोंदिया: नवेगाव-नागझरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन 1 नोव्हेंबरपासून ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यात आलेले आहे. मात्र अद्यापही काही रस्त्यांची पुर्णपणे डागडुजी झाली नसल्याने व्याघ्र प्रकल्पात ठराविक वाहनांच प्रवेश दिला जात आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान, पावसाच्या परिस्थितीनुसार पर्यटन रस्त्यांची स्थिती पाहून ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्यात आलेले होते.
या वर्षात सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे काही पर्यटन रस्ते सुस्थितीत नसून त्यांची दुरुस्ती करणे प्रस्तावित होते. त्यामुळे पावसाच्या परिस्थितीनुसार नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन रस्त्यांची स्थिती पाहून 31 ऑक्टोबरपर्यंत नागझिरा व नविन नागझिरा अभयारण्यासाठी पिटेझरी, चोरखमारा- 1 व 2 तसेच मंगेझरी प्रवेशव्दार, कोका अभयारण्यासाठी चंद्रपूर प्रवेशव्दार व नवेगाव राष्ट्रीय उद्यानाकरीता बकी व जांभळी प्रवेशव्दारावरून ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने व सुस्थितीतील निवडक रस्त्यांनेच पर्यटन सुरु करण्यात आलेले आहे. 1 नोव्हेंबरपासून नवेगाव-नागझरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यात आलेले आहे. मात्र अद्यापही काही रत्यांची पुर्णपणे डागडुजी झाली नसल्याने उपरोक्त पर्यटनाकरीता केवळ जिप्सी पर्यटन वाहन किंवा खाजगी वाहनामध्ये जमिनीपासून उंच असलेले वाहन जसे एसयूव्ही वाहने, स्कॉपीओ, जिप आदी वाहनांच पुढील आदेशापर्यंत प्रवेश देण्यात येत आहे, असे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक जयरामेगौडा आर. यांनी सांगितले आहे.