देवरीच्या तब्बल 14 वर्षापासून पोलिसांना हुलकावणी देवून फरार आरोपीस अखेर अटक,
गोंदियाः दिनांक 10/09/2008रोजी गोंदिया येथील पोलिस गार्ड खालील नमुद सराईत आरोपीत इसम नामे-1) प्रदीप शामराव पंचभाई वय 24 वर्षे रा. चोपा ता. गोरेगांव जिल्हा – गोंदिया 2) सुरेश मंगरू कोरेटी वय 35वर्षे रा.कोसबी ता.देवरी जिल्हा. गोंदिया 3) भोजराज भरतलाल केवट वय 33 वर्षे रा. गौरीटोला ता. गोरेगांव जिल्हा- गोंदिया 4) विठ्ठल गोखलू राऊत वय 34 वर्षे रा. वडेगाव ता.देवरी, जिल्हा- गोंदिया यांना सेशन ट्रायल नं. १५/२००६ मध्ये भंडारा कारागृहातुन गोंदिया येथील सबजेल येथे दाखल करण्या करिता पोलीस गार्ड सह एस.टी.बसने आणीत असताना नमुद चारही आरोपींनी सायंकाळी 4.30 वाजता सुमारास मुरदोली जंगल शिवारात लघवी लागल्याचा बहाणा करून जंगलात बस थांबविण्यास सांगून बस न थांबवील्याने 4 आरोपीपैकी एकाने ब्लेड काढून पोलीस गार्ड अंमलदार यांना ब्लेड चा धाक दाखवून, वादविवाद करून,ढकलुन व मारपीट करून चालत्या एसटी बसमधून चारही आरोपी यांनी पळण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिस गार्डनी आरोपी क्र.2 यास बसमधील सीट जवळ दाबून धरले, आरोपी क्र. 1, 3, 4 हे बेडीसह पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पुन्हा गार्ड नी आरोपी क्र.1 यास पकडले, आरोपी क्र. 3) भोजराज भरतलाल केवट वय 33 वर्षे रा. गौरीटोला ता. गोरेगांव जिल्हा- गोंदिया व ४) विठ्ठल गोखलू राऊत वय 34 वर्षे रा. वडेगाव ता.देवरी, जिल्हा- गोंदिया हे जंगलाचा फायदा घेऊन पळून गेल्याने तत्कालीन गार्ड अंमलदार पो. हवा. गेंदलाल येळे यांचे तक्रारी वरून पो.स्टे गोरेगांव येथे अप क्र. ६९/२००८ कलम ३५३, ३३२, २२४, ३४ भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान आरोपी क्रं.3 यास अटक करण्यात आली होती, परंतू आरोपी क्रं. 4) विठ्ठल गोखलू राऊत वय 34 वर्षे रा. वडेगाव ता.देवरी, जिल्हा- गोंदिया हा पोलिसांना हुलकावणी देत आपले अस्तित्व लपवून राहत असल्याने 14 वर्षा पासुन फरार होता.सदर आरोपी मिळूण न आल्याने व तो फरार असल्याने गुन्ह्यात कलम २९९ सि.आर.पी.सी. अन्वये दोषारोप पत्र मा.न्यायालयात दाखल करून न्यायप्रविष्ठ करण्यात आले होते.
सदर आरोपीवर गोंदिया जिल्ह्यात व नागपूर जिल्ह्यात जबरी चोरी, चोरी, ठकबाजी, मारपीट, धमकावणे या सारखे गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, सर यांचे निर्देशानुसार मा.अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक बनकर, यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. बबन आव्हाड यांचे मार्गदर्शना खाली सपोनी -विजय शिंदे, पो. हवा. राजू मिश्रा, महेश मेहर, पो. शि. विजय मानकर, चापोशी – मुरली पांडे, तसेच पो. हवा.दिक्षित दमाहे यांनी केली आहे.