‘संजय राऊतांना झालेली अटक बेकायदेशीर’; न्यायालयाने ईडीला झापलं

मुंबई ः पीएमएलए कोर्टाने शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना कोर्टाने ईडीला फटकारलं आहे. संजय राऊत आणि प्रविण राऊत यांची अटक बेकायदेशीर आहे, असं मत न्यायलयाने नोंदवलं आहे.

संजय राऊतांना कोणतंही कारण नसताना अटक केली, अशी टिप्पणी कोर्टाने केलीय. हायकोर्टाने विशेष पीएमएलए कोर्टाचा जामीन ऑर्डर वाचून ईडीचे कान टोचल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने याविरोधात हायकोर्टात धाव घेतली, पण हायकोर्टाने मात्र ईडीची याचिका फेटाळून लावली आणि संजय राऊत आणि प्रविण राऊत यांचा मुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. ईडीला दिलासा द्यायला हायकोर्टाने नकार दिला.

दरम्यान, संध्याकाळपर्यंत राऊत जेलमधून बाहेर येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. राऊतांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आर्थर रोड कारागृहाबाहेर सज्ज झाले आहेत.

Share