बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी प्रकल्प कार्यालय देवरी तर्फे आश्रम शाळेतील शिक्षकांसाठी जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण प्रशिक्षण

देवरी १०ः भारत सरकारने 15 नोव्हेंबर हा दिवस क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती “जनजाती गौरव दिन” म्हणून साजरी करण्याबाबत घोषित केले आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभाग, नागपूरचे अप्पर आयुक्त मा. श्री रवींद्र ठाकरे साहेब व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी चे कर्तव्यदक्ष व विद्यार्थी प्रिय प्रकल्प अधिकारी मा. श्री विकास राचेलवार साहेब यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण मिळावे आश्रम शाळेतील मुलांनी लोकल टू ग्लोबल विचार करावा स्वतःची स्वीकार्यता वाढावी यासाठी इतर संस्कृती, भाषा, धर्म, व्यक्ती यांचा आदर करावा तसेच आश्रम शाळेतील शिकणारा विद्यार्थी कायम उपयोगी व अपडेट कसा राहील तसेच कायम अपडेट राहायचे असेल तर स्वतः शिकायचे कसे ? हे विद्यार्थ्यांना समजायला हवे यासाठी मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे ,मुलांना शिकण्यात आव्हान देणे ,पीयर लर्निंग, ग्रुप लर्निंग ,विषय मित्र ,मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, एक तृतीयांश वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करणे, मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग करणे तसेच 100 टक्के विद्यार्थ्यांच्या 100 टक्के क्षमतांचा उपयोग करणे, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विशेष बुद्धिमत्तेचा शोध घेऊन त्या विशेष बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्याच्या सामान्य बुद्धिमत्तेचा विकास करणे, विद्यार्थ्यांमध्ये 21 व्या शतकातील कौशल्य जसे की क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, कोलॅबोरेशन, कम्युनिकेशन कॉन्फिडन्स, कंपेषण ही कौशल्य विकसित करणे आणि “आता शिक्षकाची भूमिका ही शिक्षकाची नाही तर सुलभकाची म्हणजे मूल शिकावे यासाठी नियोजन करणे, त्याचे व्यवस्थापन करणे आणि मुलांच्या शिकण्याचे नेतृत्व करणे ही आहे.आणि सोबतच विद्यार्थी विषय मित्र यांना सुद्धा प्रशिक्षण देण्यात येणार आहे कारण मुल हे मुलाकडून चांगल्या पद्धतीने शिकू शकते मुलांना शिकत असताना जर काही शंका असल्या तर ते शिक्षकांना न विचारता आपल्या मित्राला विचारत असतो. तसेच प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगवेगळी असते त्यामुळे काही मुलांना एकदा सांगितल्यावर समजते तर काही मुलांना पुन्हा तीच गोष्ट सांगावी लागते त्यामुळे अशावेळी विद्यार्थ्यांच्या सोबतीला असणारे विषय मित्र विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून त्यांना मदत करतात. विषय मित्र या योजनेमुळे शाळेमध्ये एक समांतर व्यवस्था उभी राहते जिथे शिक्षकांव्यतिरिक्त अध्ययन- अध्यापन ,शंका – समाधान या गोष्टी घडत असतात. यामुळे संपूर्ण शाळेमध्ये शैक्षणिक वातावरण निर्मिती होण्यास मदत होत आहे. या सर्व बाबींचे प्रशिक्षण शासकीय आश्रम शाळेतील सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नेमण्यात आलेल्या विद्यार्थी विषय मित्रांना दिनांक 15 नोव्हेंबर 2022 ते 16 नोव्हेंबर 2022 ला एकूण 88 प्राथमिक शिक्षक,पदवीधर प्राथमिक शिक्षक ,मुख्याध्यापक व 55 विद्यार्थी विषय मित्र तसेच 17 नोव्हेंबर 2022 ते 18 नोव्हेंबर 2022 ला 104 माध्यमिक शिक्षक ,उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक व 65 विद्यार्थी विषय मित्र यांना शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कडीकसा ता. देवरी जि. गोंदिया येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाला एकूण 8 सुलभक असणार आहेत तर श्री. एस. आर. सोनेवाने (सहा.प्र.अ.) हे या प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून काम करणार आहे.

Share