“कम्युनिटी पोलिसिंग” च्या माध्यमातून “माझी शाळा हरित शाळा” चिचगड पोलीसांचे स्तुत्य उपक्रम

देवरी ०९ः पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली , अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर कॅम्प देवरी, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून तसेच सपोनि.शरद पाटील, पोलिस स्टेशन चिचगड यांचे सौजन्याने ‘महाराष्ट्र व छत्तीसगड, सीमेवरील अतिसंवेदनशील, नक्सलग्रस्त, भागातील ग्राम- ककोडी येथील शासकीय आश्रम शाळा, नक्सलग्रस्त व आदिवासी बहुल भागातील विध्यार्थी यांचे प्रमाण जास्त असून यांना गोंदिया पोलिस दलाकडून “माझी शाळा हरित शाळा” (Eco friendly school) पर्यावरण पूरक वातावरण तयार व्हावे व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणून आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी व रासायनिक खतामुळे होणारे नुकसान भरमसाठ खर्च टाळून त्यांना कल्पकतेची जोड देत मिश्र शेती व इतर शेतीपूरक उद्योग यांना चालना देण्यासाठी व गोंदिया पोलिस दलाबद्दल सहानभूतीचे वातावरण निर्माण व्हावे,म्हणून आज दि- 09/11/2022 रोजी मौजा-ककोडी येथे कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून सेंद्रिय खत बनवण्याचे (किट) प्रकल्प बसवला त्याचा वापर शाळेतील झाडे,नवीन प्लॅनटेशन याकरिता होणार आहे,यावेळी शाळेचे अधीक्षक मा.नवघरे सर, मुख्याध्यापिका वनधरे मॅडम, गिरी सर,रंगारी सर, ठाकरे सर, व इतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठया संखेने हजर होते यावेळी विद्यार्थ्यांना चांगली नीतिमूल्ये व शिस्त,स्वच्छता त्याबाबत
सपोनि.शरद पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता व सामाजिक विकास तसेच पर्यावरण पूरक वातावरणान शाळेत तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले मा.यावेळी, “शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हजर होते, त्यांनी पोलिस विभागाचे या उपक्रमाबद्दल आभार मानले.

Share