शिख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांची जयंती, नगराध्यक्ष संजू उइके यांच्या सह नगरसेवकानी केले ‘प्रकाश पर्व’ यात्रेचे स्वागत
देवरी ०८ः कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पोर्णिमेला शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू, गुरू नानक यांची जयंती साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी आज म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी गुरू नानक जयंती साजरी करण्यात येत आहे. आजचा दिवस शिख समुदायाकडून गुरू पर्व किंवा प्रकाश पर्व म्हणूनही साजरा केला जातो. यंदा गुरू नानक यांची 553 वी जयंती साजरी केली जात आहे.
याच पर्वावर देवरी येथे अतिशय थाटात शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभयात्राचे स्वागत देवरीचे आद्य नागरिक नगराध्यक्ष संजू उइके यांच्या उपस्थितीत नगरसेवक रितेश अग्रवाल, शंकी भाटिया, पंकज शहारे, तनुजा भेलावे, यांनी नगरपंचायत आवारात संहॄदय स्वागत करुन आशीर्वाद घेतले.
गुरू नानक यांचा जन्म 1469 साली पंजाब प्रांतातील तलवंडी या ठिकाणी झाला. सध्या हे ठिकाण पाकिस्तामध्ये आहे. नानक लहानपणापासूनच आपला वेळ चिंतनात घालवत असत. त्यांनी कधीही संसारिक गोष्टींचा मोह ठेवला नाही. नानकांचा लहानपणापासूनच अध्यात्म आणि भक्तीकडे ओढा होता. पंजाबी, फारशी आणि अरबी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतं. वयाच्या 11 व्या वर्षी जनेऊ घालण्याची प्रथा पाळली जात असताना त्यांनी पुराणमतवादाविरोधात संघर्ष सुरू केला.
अतिशय उत्साहात देवरी येथे गुरुनानक जयंती साजरी करण्यात आली.