बिनविरोध निवडूणक घ्या आणि २५ लाखांचा विकास निधि मिळवा- आ.सहषराम कोरोटे

प्रहारटाईम्स

देवरी,ता.३०: सध्या राज्यासह जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून आमगांव-देवरी विधानसभा मतदार संघातील देवरी आमगांव व सालेकसा तालुक्यातील ग्रामपंचायतीत सर्वानुमते बिनविरोध निवडून आल्यास विविध विकास निधितुन विशेष भेट म्हणून त्या त्या ग्रामपंचायतीला २५ लाख रूपयाचा विकास निधि देणार असल्याची माहिती आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी दिली असून तरी विधानसभा क्षेत्रातील जास्तीत-जास्त ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच बिनविरोध निवडून या आणि २५ लाखांचा विकास निधि घ्या असे आवाहन आमदार सहषराम कोरोटे यांनी प्रसिद्धि पत्रकातुन केले आहे.


प्रसिद्धि पत्रकात आमदार सहषराम कोरोटे यांनी म्हटले आहे की, गावातील ग्रामपंचायत ही सर्वोच्च सभागृहाचा दर्जा प्राप्त स्थानिक संस्था असुन गावातील विकास कामाचे ग्रामपंचायत हे केंद्रबिंदु बनले आहे. गावात एकोपा व आपसातील संघटन टिकून असले की गावच्या विकासाकरिता कोणीच रोखु शकत नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्यास अशा ग्रामपंचायतिला २५ लाखांचा विकास निधि देण्यात येईल.


“गावाच्या विकासासाठी” या संकल्पनेतून आपले हे ध्येय असून सर्वसंमतीने ग्रामपंचायत सदस्य व सरपंचाची बिनविरोध निवड झाल्यास एक वेगळा पापंडा तैयार होईल व एक आदर्श इतिहास समाजात रचला जाईल. अशा ग्रामपंचायतींना गौरव व प्रोत्साहन म्हणून आपन २५ लाखांचा विकास निधि देवू आणि सोबतच गावच्या इतर कोणत्याही विधायक कामांसाठी पुढाकार घेवून विशेष लक्ष पूरविले जाईल.


ग्रामपंचतीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून या आणि २५ लाखाचा विकास निधि घ्या असे आवाहन आमदार सहषराम कोरोटे यांनी प्रसिद्धि पत्रकातुन केले आहे.

Share