लाचखोर भुमी अभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपीकावर कारवाई, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडला

तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे जमीन मोजणीसाठी व दस्ताऐवजाकरिता गोरेगाव येथील भुमी अभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपीक राजकुमार कचरु मेश्राम याने तक्रारदाराकडे चार हजार रुपयांच्या रुपयाची मागणी लाचेची मागणी केली. होती. एक हजार नायलाजाने दिल्यानंतर उर्वरित तिनं हजारांसाठी हा यशस्वी सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचला.”


प्रहार टाईम्स


गोंदिया 29:मुलांच्या नावे असलेल्या १.०९ आर जमिनीची मोजणी व दस्त मागणीकरिता लाच स्वीकारणारा गोरेगाव येथील भुमी अभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपीक राजकुमार कचरु मेश्राम लाचखोर याला गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. २९ डिसेंबर रोजी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी हौसिटोला येथील तक्रारदाराने तक्रार दिली होती.
तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. २९ डिसेंबर रोजी सापळा रचण्यात आला होता. यावेळी गोरेगाव येथील भुमी अभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपीक राजकुमार कचरु मेश्राम याने तक्रारदाराकडे चार हजार रुपयांच्या रुपयाची मागणी लाचेची मागणी केली. होती. एक हजार नायलाजाने दिल्यानंतर उर्वरित तिन हजारांसाठी हा यशस्वी सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचला. पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकोटे, स.फौ. शिवशंकर तुंबळे, ना.पो.शि.रंजीत बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन व चालक नापोशि देवानंद मारबते, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लाच मागितल्यास येथे करा तक्रारकोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास, गोंदिया अँटी करप्शन ब्युरोकडे दूरध्वनी क्र. ०७१२२-२५१२०३ किंवा मोबाइल क्रमांक ९१६८२१४१०१ किंवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे

Share