Breaking: निखील पिंगळे गोंदियाचे नवे एसपी, पोलीस अधिक्षक पानसरेंची उचलबांगडी

◼️ विश्व पानसरे यांना शिंदे फडणवीस सरकारने ठेवले नियुक्तीविना

गोंदिया २०: लातुर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची गोंदिया पोलीस अधिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रथम गडचिरोली, चंद्रपूर, पंढरपूर, वर्धा याठिकाणी निखिल पिंगळे यांनी त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांच्या तपासावर लक्ष केंद्रित केले होते.

विशेष म्हणजे खून, दरोडे, दरोड्याच्या तयारीत असलेले टोळी वाळु तस्करी अशा गंभीर गुन्ह्यांच्या तपासात त्यांचे स्थानिक पोलिसांना नेहमी मार्गदर्शन असायचे.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ गावातील एका छोट्या कुटुंबातील असेलेले “निखिल पिंगळे” पोलीस अधीक्षक पदी गोंदिया येथे नियुक्ती होत आहेत गडचिरोली, पंढरपूर, वर्धा याठिकाणी कार्यरत असताना गुन्हागारांचा कर्दनकाळ होऊन बेमोड करण्याचा आणि पोलीस प्रशासनाची गुन्हेगारांच्या प्रती जरब कायम ठेवण्यासाठी निखिल पिंगळे यांनी खास मोहीम यशस्वी राबविली होती. त्याच्या कामाप्रती निष्ठा आणि त्याच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना गोंदिया येथे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे.

गोंदिया जिल्ह्यात कायदा व्यवस्थेच्या बाबतीत ठपका ठेवण्यात आलेले आणि प्रसारमाध्यमांना जिल्ह्यात या वर्षात झालेल्या 3-4 हत्याकांडासंदर्भातील तपासाची माहिती प्रसारमाध्यमांना न देणारे महाविकास आघाडीच्या काळात आणले गेलेले पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांची अखेर गोंदियातून उचलबांगडी झाली आहे.

यांच्या जागेवर लातूरचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांची पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पानसरे यांना राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने नियुक्तीविना ठेवले आहे. गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांची पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक बदली झाली आहे.मुंबईच्या पोलीस उपआयुक्त निलोत्पल यांची गडचिरोली पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Share