महिला प्रजनन संस्था आणि आरोग्य समस्या याविषयावर प्रा. सुनंदा भुरे यांच्या विद्यार्थिनीना मार्गदर्शन

देवरी २०: महिला व विद्यार्थिनीना आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळा देवरीच्या छत्रपति शिवाजी पॉलिटेक्निक विद्यालयात आयोजित करण्यात आले होते. यावेळी कैबिनेट आफीसर लीनेस प्राध्यापिका सुनंदा भुरे-वाडीभस्मे यांनी महिला व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

महिला प्रजनन संस्था आणि आरोग्य समस्या याविषयावर प्रा. सुनंदा भुरे यांच्या विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले असून विद्यार्थिनीच्या प्रश्नांची उत्तरे यावेळी दिली. महीला सक्षमीकरण,सन्मान आणि सुदृढता तसेच भविष्यातील माता उचितनिर्णय क्षमता पबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यालयातील प्राध्यापिका, महिला, विद्यार्थिनी- विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

Share